शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

विद्यार्थी संख्या ७५ हजाराने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:46 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शाळांच्या माध्यमातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केलेली हजारो उदाहरणे समोर असताना आता या जिल्हा परिषदां मधूनच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे. बेसुमार पद्धतीने वाढणाºया खासगी शाळा, त्याला इंग्रजी माध्यमाची असलेली जोड आणि अशा शाळांकडे पाहिजे तेवढी फी देऊन ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शाळांच्या माध्यमातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केलेली हजारो उदाहरणे समोर असताना आता या जिल्हा परिषदांमधूनच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे. बेसुमार पद्धतीने वाढणाºया खासगी शाळा, त्याला इंग्रजी माध्यमाची असलेली जोड आणि अशा शाळांकडे पाहिजे तेवढी फी देऊन मुलांना अशा शाळांमध्ये घालण्याकडे पालकांचा कल यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ही गळती लागल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.गेल्या १० वर्षांचा विचार करता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिली ते चौथी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये ७५७७८ नी घट झाली आहे. त्यामध्ये ४३५६३ मुलांचा तर ३२२१५ मुलींचा समावेश आहे. तालुकास्तरीय गावे आणि तालुक्यातील मोठ्या गावांच्या ठिकाणी अनेक खासगी शाळा, अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू झाल्याने साहजिकच पालकांचा ओढा अशा शाळांकडे वाढला आहे.जिल्हा परिषदांच्या शाळांबाबत आणि तेथील अध्यापनाच्या दर्जाबाबतही सुशिक्षित पालकांमध्ये शंका उत्पन्न होत असल्याचे चित्र दिसत असून त्याचाच हा मोठा परिणाम मानला जातो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्याच मुलांचे २जर सर्वेक्षण केले तर अनेक शिक्षकांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकत नाहीत हे वास्तव आहे.एकीकडे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आजरा, भुदरगड, राधानगरी तालुक्यातील विद्यार्थी राज्यात आपला दबदबा निर्माण करत असताना दुसरीकडे अन्य निमशहरी तालुक्यांना ही गुणवत्ता राखताना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबणूक करत असताना दुसरीकडे पाट्या टाकणाºया शिक्षकांचीही संख्या मोठी आहे. शासनाच्या बदलत्या धोरणांचाही परिणाम होत असल्याचेही चित्र जिल्'ात दिसून येते. दर आठ-दहा दिवसांनी शासनाचे वेगवेगळे येणार आदेश, माहितीचे संकलन करण्यात अडकलेले शिक्षक आणि शिक्षिका, अधिकारी बदलला किंवा सत्ता बदलली की बदलणाºया योजना याचा परिणाम शाळांवर होत असल्याचेही सांगण्यात येते.विद्यार्थ्यांची झालेली घट तालुकानिहायतालुका ३० सप्टेंबर २००६ ३० सप्टेंबर २०१६ झालेली घटआजरा १२००० ०७१७६ ०४८२४गगनबावडा ०३४९० १०५१९ अधिक ७०२९भुदरगड १५५५९ १४०५८ ०१५०१चंदगड २०३८१ १०८९४ ९४८७गडहिंग्लज १६७१४ ०३२९० १३४२४हातकणंगले ३५२५८ २२४४१ १२८१७कागल २२८७९ १६१२६ ०६१३१करवीर ३८१११ २८५०८ ०९६०३पन्हाळा २३०२७ १६८२३ ०६२०४राधानगरी २००५९ १५०८१ ०४९७८शाहूवाडी २१०१४ १५०२९ ०५९८५शिरोळ २६९९१ १९१३८ ०७८५३एकूण २५४८६१ १७९०८३ ७५७७८गगनबावड्यातउलट परिस्थितीएकीकडे ११ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना गगनबावडा तालुक्यात मात्र याच्या नेमकी उलटी परिस्थिती दिसत आहे. या तालुक्यात दि. ३० सप्टेंबर २००६ मध्ये ३५४० विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत होते तर सप्टेंबर २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तब्बल १०५१९ विद्यार्थी शिकत आहेत म्हणजेच ७०२९ विद्यार्थी संख्या या शाळांमध्ये वाढली आहे. अतिशय दुर्गम भाग आणि छोटी, गावे, वाड्या, वस्त्या असल्याने येथे खासगी शाळा फारशा नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांशिवाय पर्याय नसल्याचे चित्र येथे दिसून येते.

टॅग्स :Schoolशाळाkolhapurकोल्हापूर